प्रशासकीय सुधारणा विभागाच्या सचिव पी. हेमलता यांची सुवर्णविधानसौधला भेट
प्रतिनिधी /बेळगाव
येथील सुवर्णविधानसौधमध्ये दि. 13 डिसेंबरपासून सुरू होणाऱया कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी वरि÷ अधिकाऱयांनी तयारीचा आढावा घेतला. प्रशासकीय सुधारणा विभागाच्या सचिव पी. हेमलता यांनी तयारीची पाहणी करून अधिकाऱयांची बैठकही घेतली.
हेमलता यांनी बुधवारी सुवर्णविधानसौधला भेट देऊन सभागृह, सभाध्यक्षांचे कार्यालय, सत्ताधारी व विरोधी पक्षांचे सेंट्रल हॉल, अधिकाऱयांची कार्यालये आदींची पाहणी केली. सुरक्षा व्यवस्थेचाही त्यांनी आढावा घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापक खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही हेमलता यांनी केली.
जर आरटीपीसीआर अहवाल सक्तीचा केल्यास लोकप्रतिनिधींची तपासणी करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी. सध्या सुवर्णविधानसौधमध्ये सुरू असलेली कार्यालये अधिवेशन संपेपर्यंत तळमजल्यावर हलविण्यात आली आहेत. याचीही त्यांनी पाहणी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकांनी मार्गसुचींचे पालन करावेत. यासाठी विशेष पथकांचे नियोजन करावे. अधिवेशनाच्या काळात इंटरनेट, संगणक, फोन, पिण्याचे पाणी, वाहतूक व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, सुरक्षा व्यवस्था, अग्निशमन दल तैनात ठेवण्यासंबंधीही बैठकीत चर्चा करण्यात आली.
सुवर्णविधानसौधसह आमदार, मंत्री ज्या-ज्या ठिकाणी वास्तव्य करणार आहेत त्या ठिकाणी त्यांना गुणवत्तेचे जेवण मिळते का? याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. उपचारासाठी रुग्णवाहिका व वैद्यकीय पथकांचे नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ यांनी बैठकीत दिली.
यावेळी जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., विशेष अधिकारी डॉ. सुरेश इटनाळ, अप्परजिल्हाधिकारी डॉ. शंकराप्पा वनक्मयाळ, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी, अप्पर प्रादेशिक आयुक्त गीता कौलगी, महापालिका आयुक्त डॉ. रुदेश घाळी, अन्न व नागरी पुरवठा खात्याचे सहसंचालक सी. बी. कोडली, आरटीओ विभागाच्या सहआयुक्त शोभा, सार्वजनिक बांधकाम खात्याचे संजीवकुमार हुलकाई, माहिती खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर आदींसह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिकांना सूचना : दोन्ही डोस घेतलेल्यांनाच हॉटेलात प्रवेशाचा आदेश
आगामी काळात होणाऱया हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जोरदार तयारी चालविली असून, महापालिकेचे निम्म्याहून अधिक कर्मचारी याकामी गुंतले आहेत. तसेच कोरोना विषाणूच्या प्रसाराची धास्तीदेखील वाढली आहे. त्यामुळे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच हॉटेलमध्ये प्रवेश देण्याची सूचना महापालिका आयुक्तांनी केली आहे.
अधिवेशनाच्या तयारीसाठी महापालिका आयुक्तांनी हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेऊन विविध सूचना केल्या. अधिवेशनासाठी लागणाऱया खोल्यांची माहिती देऊन अधिवेशन काळात कोणत्याही प्रकारचे बुकिंग घेऊ नये, अशी सूचना केली. तसेच दोन डोस घेतलेल्यांनाच हॉटेलमध्ये प्रवेश द्यावा, अशी सूचना आयुक्तांनी हॉटेल व्यावसायिकांना केली. 12 डिसेंबर ते 24 डिसेंबरपर्यंत हॉटेलमधील खोल्या राखीव ठेवण्याची सूचना आयुक्तांनी केली. तसेच हॉटेलमध्ये येणाऱया प्रत्येकाची तपासणी करावी, दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश द्यावा, कर्मचाऱयांनी आणि अधिकाऱयांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. तसेच सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे. प्रत्येक खोलीत रोगप्रतिबंधक औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. कोणत्याही नागरिकाला कोरोनाची लक्षणे आढळल्यास तात्काळ मदत केंद्रावर संपर्क साधावा, अशा विविध सूचना करून नियमावलीची माहिती आयुक्तांनी दिली. यावेळी हॉटेल व्यावसायिक व अधिकारी उपस्थित होते.