अधिकाऱयांना केल्या सूचना : मागील चुका सुधारा
प्रतिनिधी /बेळगाव
हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये होत आहे. त्याची तयारी करण्याबाबत जिल्हाधिकारी वेंकटेश कुमार यांनी अधिकाऱयांची मंगळवारी बैठक बोलाविली होती. या बैठकीमध्ये येणाऱया अधिकारी व कर्मचाऱयांची योग्यप्रकारे सोय करण्याची सूचना केली आहे. कोरोनाच्या मार्गसूचीचे पालन करत अधिकाऱयांनी अत्यंत काळजीपूर्वक काम करावे, असे त्यांनी यावेळी अधिकाऱयांना सांगितले.
लॉकडाऊननंतर अनेक हॉटेल्स, गेस्ट होऊस बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्याठिकाणी स्वतः जाऊन पाहणी करून स्वच्छता करण्याबाबत पाऊल उचलावे, असे त्यांनी सांगितले. कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, असेही त्यांनी यावेळी सांगितले. येणाऱया अधिकाऱयांची सुरक्षितता तसेच त्यांना इतर सोयीसुविधा वेळेत पुरवा, पार्किंगची सोय करावी, याबाबतही त्यांनी सूचना केल्या.
अधिवेशन काळात काम करत असताना सरकारने दिलेल्या मार्गसूचीनुसारच काम करावे, तोंडाला मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा, याचबरोबर सोशल डिस्टन्सही ठेवावा, असे त्यांनी सांगितले. सध्या विधानपरिषद निवडणूक आहे. त्यामुळे प्रथम विधानपरिषदेची निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्याबाबत काळजी घ्या. त्यानंतर अधिवेशनच्या कामाला लागावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मागील अधिवेशनाच्या वेळी ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्यावर सर्वांनी चर्चा करून पुन्हा त्या समस्या निर्माण होऊ नयेत याबाबत दक्षता घ्यावी. आलेल्या अधिकारी व इतर कर्मचाऱयांच्या जेवणाची सोय योग्यप्रकारे करावी. याचबरोबर त्यांना ने-आण करण्यासाठी देखील वाहनांची सोय करण्यासाठी नियोजन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला पोलीस आयुक्त डॉ. त्यागराजन हे उपस्थित होते. त्यांनी सध्या पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या व कामगारांच्या निवासासाठी तात्पुरते चांगल्या प्रकारच्या मंडपाची उभारणी करावी, असे अधिकाऱयांना सांगितले. या बैठकीला जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन के. एच., जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे, प्रांताधिकारी रविंद्र करलिंगन्नावर, स्मार्ट सिटीचे अधिकारी शशीधर कुरेर, अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे जिल्हा उपसंचालक सी. बी. कोडली, यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.