अमेरिकन रॅपरः टेस्लाच्या सीईओचा पाठिंबा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकन रॅपर आणि जगप्रसिद्ध मॉडेल किम कर्दाशियांचा पती कान्ये वेस्टने अध्यक्षीय निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे. देवावर विश्वास ठेवून अमेरिकेच्या आश्वासनांना पूर्ण करावे लागणार आहे. सर्वांची ध्येयधोरणांना संयुक्त स्वरुप देत भविष्यासाठी काम करावे लागणार असल्याचे वेस्टने ट्विट करत म्हटले आहे. त्याच्या या ट्विटला एका तासातच 1 लाख वेळा री-ट्विट करण्यात आले आहे.
कान्ये याच्या उमेदवारीला पूर्ण समर्थन असल्याचे प्रतिपादन टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऍलन मस्क यांनी केले आहे.
सद्यकाळात निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यास कान्ये यांना अनेक अडथळय़ांना तोंड द्यावे लागू शकते. निवडणुकीच्या वर्षात जुलै महिन्यापासून प्रचार सुरू करणे सर्वात मोठे आव्हान असेल. तसेच कुठल्याही राजकीय पक्षाच्या मदतीशिवाय अध्यक्षीय निवडणुकीत भाग घेणे आव्हानात्मक राहणार आहे.