ऑनलाईन टीम / श्रीनगर :
दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात आज दुपारी मरहामा भागात संशयित सशस्त्र दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. हल्ल्यानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून, हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
दरम्यान, सोमवारीही सायंकाळी शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी बीडीसीच्या कर्मचाऱ्याच्या घरात घुसून त्याला गोळ्या घालून ठार केले. या घटनेनंतर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र, त्यांचा सुगावा लागला नाही.
सब्जर अहमद नायकू असे या गोळ्या घालून ठार करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. घटनेनंतर लगेचच आसपासच्या लोकांनी त्याला स्थानिक रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.