ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला. या हल्ल्यात एका 12 वर्षीय मुलांचाही मृत्यू झाला आहे.
आज दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी दुचाकीवरून आलेल्या दहशतवाद्यांनी अनंतनागमध्ये गस्त घालत असलेल्या सीआरपीएफच्या 90 बटालीयनवर अचानक गोळीबार केला. या हल्ल्यात एक जवान आणि 12 वर्षाचा मुलगा जखमी झाला होता. उपचारादरम्यान दोघांचीही प्राणज्योत मालवली.
दरम्यान, आज पहाटे पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले.