प्रतिनिधी /मडगाव
wपर्वती, पुणे येथील अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या तिसऱया वर्षातील विद्यार्थी मडगाव (गोवा) येथील वारसा संवर्धन हॉटेल रिसॉर्ट हॉस्पिटॅलिटी इनिस्टटय़ूट चा अभ्यास करण्यासाठी खास दौऱयावर आले आहेत. हा दौरा 9 ते 12 नोव्हेंबर पर्यंत असून त्यात 30 विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा समावेश आहे.
पोर्तुगीज राजवटीच्या अमलाखालील गोवा राज्यातील ऐतिहासिक सामाजिक बदलांचा अभ्यास विद्यार्थी या दौऱयात करीत आहे. मडगाव येथील हेरिटेज वॉक आर्किटेक यतिन कांदोलकर, आर्किटेक शल्का नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास दौरा चालू आहे. मडगाव परिसरातील पारंपारिक घरे तसेच चर्च व सामुदायिक जागा यांचा मुलांनी अभ्यास केला. गोवा राज्याची स्थापना व विविध प्रकारची घरे व चर्चेस या विषयी त्यांनी विस्तारीत अभ्यासपूर्वक माहिती देऊन विद्यार्थ्यांना प्रभावित केले.
दक्षिण गोव्यातील केळशी येथील प्रसिद्ध हॉटेल हॉलिडे इन या पंचतारांकीत हॉटेल्स ऍन्ड रिसोर्टचा व मडगावच्या हॉटेल लक्ष्मी ऐंपायर यांचा प्लांनिंग व लेंण्ड स्केप चा सविस्तर अभ्यास, प्रसिद्ध आर्किटेक्ट मंगेश प्रभुगांवकर यांच्याशी उपयुक्त संवाद साधला. याच बरोबर मुलांनी साळगांवकर इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट व इतर महत्वाच्या ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास केला. तसेच डॉक्टर आशिष रेगे, आर्किटेक्ट गौतम देसाई यांच्या सोबत आर्किटेक्चरल प्रोफेशन व संधी तसेच उत्तम प्लॅनर म्हणून असणारी आर्किटेक्टची जबाबदारी अशा अनेक विषयांवर मुलांनी उपयुक्त असा संवाद साधला.
विद्यार्थी, हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट व हॉलिडे इन यांच्या अंतर्गत प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणार असून गोवा राज्यातील विविध पर्यटन स्थळांचा व पर्यटकांचा अभ्यास करून आधुनिक प्रकारच्या सोयी व सुविधा युक्त असे हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट ची रचना करणार आहेत.
या अभ्यासदौऱयासाठी गोव्याच्या वास्तु महाविद्यालयाने सर्व प्रकारची मदत केली आहे. हा अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. राजेंद्र कोळी, प्रा. शिल्पा इंगवले व प्रा. वैष्णवी जगताप तसेच शिवानी सातपुते यांचे विशेष सहकार्य लाभले. अभ्यासदौरा नियोजनाकरिता संस्थेच्या सरचिटणीस माननीय प्रमिलाताई गायकवाड यांचे ही मौल्यवान प्रोत्साहन लाभले.