व्हॉल्वमध्ये सांडपाणी मिसळत असल्याची तक्रार, दुरुस्तीकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळण्याचे प्रकार सुरूच असून अनंतशयन गल्लीतील डेनेजवाहिनीच्या दुरुस्तीकडे महापालिका आणि एलऍण्डटी कंपनीचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी परिसरातील रहिवाशांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. सातत्याने तक्रार करूनही मनपा प्रशासनाच्या अधिकाऱयांनी कानाडोळा केला असल्याचा आरोप होत आहे.
सांडपाण्याचे चेंबर आणि पाणी पुरवठय़ाचे व्हॉल्व जवळजवळ असल्याने सांडपाणी मिसळण्याचे प्रकार होत आहेत. डेनेज चेंबर आणि पाणी पुरवठय़ाचे व्हॉल्व एकत्र येणार नाहीत. याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी सातत्याने केली जाते. मात्र, मनपा अभियंत्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सांडपाणी मिसळण्याचे प्रकार वाढले आहेत. अनंतशयन गल्लीमध्ये डेनेजवाहिनी तुंबली असून सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिणामी डेनेज चेंबरमधून सांडपाणी ओक्हरफ्लो होण्याचे प्रकार वाढले आहेत.
या ठिकाणी डेनेज चेंबरमधून सांडपाणी वाहून जवळच असलेल्या पाणी पुरवठय़ाच्या व्हॉल्वमध्ये जात आहे. त्यामुळे या परिसरात डेनेजमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. सांडपाणी व्हॉल्वमध्ये मिसळून नळांना दूषित पाणी येत असल्याची तक्रार येथील रहिवाशांनी महापालिकेकडे तसेच एलऍण्डटी कंपनीकडे केली होती. पण याची दखल घेण्यात आली नाही. सातत्याने तक्रार करूनही महापालिकेच्या अधिकाऱयांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. जानकी पॅलेसजवळ डेनेज वाहिनीतून वाहणारे पाणी व्हॉल्वमध्ये मिसळत असल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. महापालिकेच्या वरिष्ट अधिकाऱयांनी याची पाहणी करून समस्येचे निवारण करावे, अशी मागणी होत आहे.