16 रोजी डोंगरावर पडल्या भरण्याचा कार्यक्रम होणार
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुळे सर्व मंदिरे बंद होती. सौंदत्ती यल्लम्मा देवीचे मंदिरदेखील बंद ठेवण्यात आले होते. मात्र, आता ते मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे अनगोळ येथील भाविक सौंदत्ती यात्रेला रवाना होणार आहेत. मंगळवार दि. 16 रोजी यल्लम्मा डोंगरावर सामूहिकरित्या देवीची पडली भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. अनगोळ गावचे भक्त देवीचा जग घेऊन रविवार दि. 14 रोजी सकाळी 9 वाजता भांदूर गल्ली, रेणुका देवी मंदिरापासून सौंदत्ती डोंगराकडे रवाना होणार आहेत. तेथे पडल्यांचा कार्यक्रम करून शुक्रवार दि. 19 रोजी दुपारी 4 वाजता अनगोळ येथे मळय़ामधील यात्रा भरणार आहे. भाविकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन श्री रेणुका मंदिर अनगोळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.