मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई : दर्शनासाठी भाविकांची गर्दी
प्रतिनिधी /बेळगाव
घटस्थापनेनंतर दसरोत्सवाला मोठय़ा उत्साहात अनगोळ येथे सुरुवात झाली. मंदिरांमध्ये सकाळी आणि सायंकाळी पूजा-अर्चा तसेच आरती कार्यक्रम पार पडत आहेत. मागील वषी कोरोनामुळे निर्बंध होते. मात्र यावषी कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने आता भक्तांनी मंदिरामध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
अनगोळ गावामध्ये अनेक संस्थानिक काळातील मंदिरे आहेत. जागृत मंदिरे म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. या मंदिरांमध्ये धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने करण्यात येतात. ग्रामदेवता मंदिरामध्ये गाऱहाणे तसेच विविध रुपांमध्ये देवीला सजविण्यात येते. मंदिरांमध्ये अखंड दिवा तेवत असतो. मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
कलमेश्वर मंदिर हे गावचे ग्रामदैवत आहे. या मंदिराच्या स्थापनेपासूनच दसरोत्सव मोठय़ा उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. गाभाऱयातील शिवलिंगाला विविध प्रकारची आरास केली जाते. विडय़ाची पाने, चांदीची कमान, पितळी कमान, पिंडीवर कलमेश्वर देवाचा मुखवटा आणि त्यावर फुलाने सजविलेल्या माळा त्यामुळे मंदिरामध्ये एक वेगळा आकर्षकपणा पहायला मिळतो. सायंकाळी 8 वाजता हक्कदार, पंच व भक्तांच्या उपस्थितीत पूजा, अर्चा केली जाते. यावेळी वाद्यही वाजविले जाते. या आरतीला मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित असतात. शेवटच्या दिवशी पालखी देखील काढली जाते.
मारुती मंदिर हेही पुरातन मंदिर आहे. या मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या मंदिरामध्येही भक्तिभावाने पूजा-अर्चा करण्यात येते. मरगाई मंदिरावरही विद्युत रोषणाई तसेच या मंदिरामध्ये पूजा, अर्चा केली जात आहे. रेणुका मंदिर, लक्ष्मी मंदिर, दत्त मंदिर यासह इतर मंदिरांमध्येही पूजा-अर्चा सुरू आहे. या दसरोत्सवामुळे अनगोळ परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.