बेळगाव : अनगोळ कलमेश्वर मंदिर येथे मंगळवारी सकाळी होमहवन व विशेष पूजा करण्यात आली. ग्रामदेवता कलमेश्वर मंदिर येथे शेतकरी रवी तवनाप्पा पाटील व गीता पाटील या दांपत्याच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी गावातील शेतकरी व पंचकमिटी यांच्यावतीने होमहवन करण्यात आले.
गावातील रोगराई दूर व्हावी, चांगली पिके पिकू दे, देशावरील कोरोनाचे संकट दूर होवू दे, नागरिकांचे आरोग्य व जनावरांचे आरोग्य उत्तम रहावे, सर्वांना नोकरी, व्यवसाय यामध्ये यश, विद्यार्थ्यांना यश मिळू दे यासाठी ही पूजा करण्यात आली.
अनगोळ गावातील शेतकऱयांच्यावतीने गावामध्ये पाच वार पाळणूक करण्यात आली होती. सोमवारी शेवटचा वार पाळणूक झाल्यानंतर पूजा व होमहवन करण्यात आला आहे. याचबरोबर गावातील सर्व देवदेवतांची ओटी भरण्याचा कार्यक्रमही यावेळी पार पडला. या कार्यक्रमाला शेतकरी, महिला व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.