प्रतिनिधी/ बेळगाव
अनगोळ रहिवाशांची समस्या सोडविण्यासाठी नव्याने डेनेज वाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र सध्या काम रखडले असल्याने समस्येत आणखीन भर पडली आहे.
शहरातील विविध भागातील सांडपाणी समस्या निवारणासाठी अमृत योजनेमधून डेनेज वाहिन्या घालण्यात येत आहेत. पण सदर काम व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. डेनेज वाहिन्या घालण्यासाठी खोदण्यात आलेल्या चरी व्यवस्थित बुजविण्यात आल्या नसल्याने शास्त्राrनगर, शहापूर, अनगोळसह विविध परिसरातील रस्ते खराब झाले आहेत. आता अनगोळ परिसरात डेनेज वाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. पण सदर काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खोदण्यात आलेला रस्ता पूर्णपणे बंद झाला असून काही ठिकाणी डेनेज वाहिन्या आणि चेंबर खराब झाले असल्याने चरीमध्ये सांडपाणी साचून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिसरातील रहिवाशांना याचा त्रास होत असून पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांनी याकडे कानाडोळा केला आहे.
डेनेजबाबतच्या समस्येचे निवारण होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. पण आता समस्यांमध्ये भरच पडली आहे. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनगोळ परिसरातील एका गल्लीमध्ये डेनेज वाहिनी घालण्यात आली आहे. पण आता दुसऱया गल्लीत देखील पुन्हा नव्याने डेनेज वाहिनी घालण्यात येत आहे. मात्र सदर काम कूर्मगतीने सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहे. सदर काम करण्यासाठी येणाऱया कामगारांनी वेळकाढूपणा चालविला आहे. यामुळे याबाबत कंत्राटदाराच्या प्रतिनिधीकडे तक्रार केली असता याची दखल घेण्यात आली नाही. यामुळे सदर काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.