इमारतीत अस्वच्छता, पशुपालकांची पाठ, स्वच्छतेची मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
संत मीरा रोड, अनगोळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरवस्था झाली असून इमारतीच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने दवाखाना अस्वच्छतेच्या कचाटय़ात सापडला आहे. त्यामुळे जनावरांवर उपचार करणाऱया पशूवैद्यकीय दवाखान्यालाच आता उपचाराची गरज असल्याचे मत परिसरातील पशूपालकांतून व्यक्त होत आहे. मुक्मया जनावरांच्या उपचार व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
येथील संत मीरा रोडवर गेल्या अनेक वर्षांपासून पशूवैद्यकीय दवाखाना आहे. मात्र या इमारतीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने इमारतीला भेगा पडून रंग उडाला आहे. इमारतीच्या खिडक्मया व इतर साहित्याची दुर्दशा झाली आहे. आवारात झाडे-झुडुपे वाढून परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. आवारात मलमूत्र विसर्जन करण्यात येत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. परिणामी इमारतीत काम करणे देखील डॉक्टरांना धोक्मयाचे बनले आहे.
दवाखान्याच्या अर्ध्या भागाला संरक्षक भिंत नसल्याने मोकाट कुत्री, डुक्करांचा संचार वाढला आहे. त्यामुळे याठिकाणी आजारी जनावरे घेऊन जाणे धोक्मयाचे बनले आहे. तातडीने दवाखान्याची स्वच्छता करून सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी होत आहे.
शासन एकीकडे गोहत्या बंदी कायदा अंमलात आणत आहे. गो-शाळा-दवाखान्यांसाठी शासनस्तरावर कोटय़वधी रुपये खर्चही केले जातात. मात्र दुसरीकडे या जनावरांच्या उपचारासाठीची असलेली यंत्रणा मात्र अत्यंत खिळखिळी झाल्याचे दिसून येत आहे..