टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर
बेळगाव : राजहंस गल्ली, अनगोळ येथील एक महिला आपल्या 17 वषीय मुलीसह बेपत्ता झाली आहे. यासंबंधी टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले असून पोलीस या माय-लेकीचा शोध घेत आहेत.
विजयलक्ष्मी राजू करेगार (वय 36), मुलगी रिया राजू करेगार (वय 17, दोघीही रा. राजहंस-कुरबर गल्ली, अनगोळ) अशी त्यांची नावे आहेत. 27 जानेवारी रोजी दुपारी सेंट जोसेफ कॉलेजला जाऊन येण्याचे सांगून या दोघी घराबाहेर पडल्या आहेत. विजयलक्ष्मी यांनी घराबाहेर पडताना गुलाबी साडी परिधान केली होती. तर मुलगी रियाने निळे चुडीदार परिधान केले आहे. या माय-लेकींविषयी कोणाला माहिती मिळाल्यास 0831-2405236 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.