टिळकवाडी पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
अनगोळ येथे एका मटकाबुकीला अटक करण्यात आली आहे. टिळकवाडी पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली आहे. त्याच्यावर कर्नाटक पोलीस कायद्या 78(3) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मंजूर हनीफ कित्तूर (वय 32, रा. आंबेडकरनगर, अनगोळ) असे त्याचे नाव आहे. त्याच्या जवळून 2 हजार 80 रुपये रोख रक्कम व मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. टिळकवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.