प्रतिनिधी / बेळगाव
मध्यवर्ती म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी बुधवारी सकाळी अनगोळ व शहापूर पसिरात जोरदार प्रचार केला. निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी प्रचारातील रंगत वाढताना दिसत आहे. म. ए. समितीच्या उमेदवाराला जोरदार प्रतिसाद मिळू लागला आहे.
सकाळी अनगोळ परिसरात प्रचार करण्यात आला. शुभम शेळके यांनी गल्लोगल्ली जाऊन म. ए. समितीलाच मतदान करण्याचे आवाहन केले. मराठी भाषा व संस्कृती टिकवायची असेल तर समितीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे बेळगावमध्ये मराठीपण टिकवायचे असेल तर समितीलाच मतदान करा, असे त्यांनी मतदारांना सांगितले. अनगोळमध्ये समितीच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गल्लोगल्ली शुभम शेळके यांचे स्वागत करण्यात आले.
शहापूरमध्ये जल्लोषी स्वागत
शहापूर विभागात प्रचार करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्मयांच्या आतषबाजीत शेळके यांचे स्वागत करण्यात आले. रामलिंगवाडी गोवावेस येथून प्रचाराला सुरुवात झाली. कोरे गल्ली, दाणे गल्ली, खडेबाजार, भोज गल्ली, जेड गल्ली, मेलगे गल्ली, अळवण गल्ली, आनंदवाडी, हट्टीहोळ गल्ली, महात्मा फुले रोड, कचेरी गल्ली, मीरापूर गल्ली, होसूर, बसवाण गल्ली, जुना धारवाड रोड, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, बिच्चू गल्ली, सराफ गल्ली, गाडे मार्ग, पवार गल्ली, संभाजी रोड, जोशी मळा, उप्पार गल्ली, नाथ पै चौक, लक्ष्मी रोड या परिसरात प्रचार करण्यात आला.