दोन तरुणांच्या उपक्रमाबद्दल कौतुक
प्रतिनिधी /बेळगाव
शेतकऱयांना शेताकडे ये-जा करण्यासाठी रस्ते करण्यात आले. मात्र आता या रस्त्याच्या बाजूला बसून तरुणाई मद्यपान करत आहे. याचबरोबर शिवारामध्ये ओल्या पाटर्य़ा देखील करत आहेत. शिवारातच काचेच्या बाटल्या, प्लास्टिक ग्लास फेकत आहेत. त्यामुळे अनगोळ येथील विद्यार्थ्यांनी शिवारातील त्या काचेच्या बाटल्या तसेच इतर साहित्य गोळा करण्याचा उपक्रम राबविला. यामुळे शेतकऱयांतून समाधान व्यक्त होत आहे.
अनगोळ तसेच परिसरातील शिवारामध्ये शेतकऱयांना शेताकडे जाण्यासाठी रस्ते करण्यात आले आहेत. मात्र या रस्त्याच्या बाजूला तसेच शिवारात बसून पाटर्य़ा केल्या जात आहेत. त्यामुळे तरुणाई भरकटली जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. अशाप्रकारे शिवारामध्ये पाटर्य़ा करून बाटल्या फोडणे योग्य नाही. तेव्हा याचा प्रत्येकाने विचार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कचरा न फेकण्याचे आवाहन
ऋतिकेश लक्ष्मण मुतगेकर आणि प्रमोद पांडुरंग मुतगेकर या तरुणांनी शिवारातील कचरा गोळा केला. याचबरोबर या परिसरात धूम्रपान व मद्यपान करू नये, असे फलक देखील उभे केले आहेत. शेतकऱयांना त्रास होवू नये म्हणून या दोन्ही तरुणांनी संपूर्ण शिवारामध्ये आणि रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेला कचरा गोळा केला आहे. याची दखल घेऊन तरुणांनी शिवारामध्ये कचरा फेकू नये, असे आवाहन केले आहे.