साईराज चषक वॉर्डनिहाय क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक वॉर्डनिहाय क्रिकेट स्पर्धेत अनगोळ स्ट्रायकरने नरवीर संघाचा सिद्धकला अनगोळ संघाने साईराज वॉरियर्सचा, एपिएस वॉरियरने विराट स्पोर्ट्सचा तर अलरजा संघाने क्रिकेट लव्हर्सचा संघाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. जावेद धामणेकर, संतोष जाधव, समीर येळ्ळूरकर, शाबाब आडेवाले सामनावीर ठरले.
व्हॅक्सिन डेपो मैदानावर नरवीर संघाने 8 षटकात 9 बाद 57 धावा केल्या. अमोल यल्लुप्पाचेने 16 तर सचिन बी ने 11 धावा केल्या. अनगोळ स्ट्रायकरतर्फे जावेत व निखील यांनी प्रत्येकी 3 तर वसंतने 2 गडी बाद केले. अनगोळ स्ट्रायकर्सने 4.5 षटकात 1 बाद 58 धावांसह सामना जिंकला. जावेद धामणेकरने नाबाद 33, रामनाथ काळेने नाबाद 24 धावा केल्या.
दुसऱया सामन्यात साईराज संघाने 8 षटकात 5 बाद 70 धावा केल्या. आनंद चव्हाणने 30 तर अनिल सप्लीगाने 28 धावा केल्या. सिद्धकलातर्फे सुनिलने 3 गडी बाद केले. सिद्धकला अनगोळने 6.4 षटकात 71 धावा करून सामना 5 गडय़ांनी जिंकला. संतोष जाधवने 28 तर प्रमोद पालेकरने 14 धावा केल्या. साईराजतर्फे आनंद चव्हाणने 3 तर अनिल सप्लीगाने 2 गडी बाद केले.
तिसऱया सामन्यात एपीएस वॉरियर्सने 6 बाद 128 धावा केल्या. समीर येळ्ळूरकरने नाबाद 67 तर पवन शर्माने 31 धावा केल्या. विराटतर्फे सुरजने 2 गडी बाद केले. त्याला उत्तर देताना विराट संघाने 8 षटकात 1 बाद 91 धावाच केल्या. त्यात राहुल शिंदेने नाबाद 53 धावा केल्या. चौथ्या सामन्यात अलरजाने 5 बाद 55 धावा केल्या. अझर गवसने 30 धावा केल्या. क्रिकेट लव्हर्सने 7 बाद 42 धावाच केल्या. सादीक आड्डेवालेने 3 गडी बाद केले.
आजचे उपांत्य सामने : 1) अनगोळ स्ट्रायकर्स वि. एपीएस वॉरियर्स सकाळी 11 वा. 2) सिद्धकला अनगोळ वि. अलरजा यांच्या दुपारी 1 वा.