प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हाधिकाऱयांनी पर्ससीन मच्छिमार नौकांवर कारवाई करण्याचे निर्देश देवूनसुध्दा मत्स्य विभाग पर्ससीनसह अनधिकृत एलईडी नौकां विरोधात कारवाई करत नसल्यामुळे मिरकरवाडा बंदर ट्रॉलिंग लॉच मालक व मच्छीमार असोसिएशनने या संदर्भात अप्पर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड यांना निवेदन देण्यात आल़े
यावेळी पारंपरिक मच्छीमार आप्पा वांदरकर म्हणाले की, एलईडी व पर्ससीन नौकांना मासेमारीसाठी बंदी आहे. तरीसुध्दा कोकण किनारपट्टीवर सुमारे 600 ते 700 अनधिकृत नौकांद्वारे मासेमारी करण्यात येत आहे, त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांना मासळी न मिळाल्यामुळे उपासमारीची वेळ ओढावली आह़े प्रजासत्ताकदीनी पारंपरिक मच्छीमारांनी 400 मच्छीमारांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होत़े जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याची दखल घेत मत्स्य व्यवसाय विभागाला मिरकवाडा बंदरातील पर्ससीनेट व एलईडी नौकांवरती कारवाई करण्याचे आदेश दिले होत़े मात्र या आदेशाला मत्स्य व्यवसाय विभागाने केराची टोपली दाखवल्याचे, मच्छीमारांचे म्हणणे आह़े एलईडी आणि पर्ससीन मासेमारीबाबत मत्स्य विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील पारंपरिक मच्छीमारांनी केला आहे. त्यामुळे याप्रकरणी पर्ससीन व एलईडी नौकांना पाठीशी घालणाऱया अधिकाऱयांची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी पारंपरिक मच्छीमारांनी जिल्हाधिकाऱयांसह अप्पर पोलीस अधिक्षकांकडे केली आह़े त्यामुळे पुन्हा एकदा पारंपरिक आणि पर्ससीन मच्छीमारी यांच्यात संघर्ष पेटण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत