सिद्धांत चतुर्वेदी अन् आदर्श गौरवसोबत ‘खो गये हम कहां’
अभिनेत्री अनन्या पांडेला तिच्या कारकीर्दीतील सहावा चित्रपट मिळाला आहे. या चित्रपटाचे नाव ‘खो गये हम कहां’ असून याची निर्मिती फरहान अख्तर करत आहेत. तर अर्जुन वरेन सिंह दिग्दर्शन करणार आहे. चित्रपटात अनन्यासोबत गली बॉय फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि द व्हाइट टायगरमधील अभिनयाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकणारा आदर्श गौरव दिसून येणार आहे.
या चित्रपटाची पटकथा जोया अख्तर, रीमा कागती आणि अर्जुन वरेन सिंह यांनी लिहिली आहे. आदर्श गौरव अलिकडेच अमेझॉन प्राइम प्रदर्शित हॉस्टेल डेजमध्ये दिसून आला होता. चित्रपटाच्या घोषणेसह त्याचा फर्स्ट लुकही प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
अनन्याने अलिकडेच शकुन बत्रा दिग्दर्शित चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोन आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत ओत. खो गये हम कहां हा सिद्धांतसोबतचा अनन्याचा दुसरा चित्रपट आहे. याचबरोबर अनन्या सध्या लायगरचे चित्रिकरण करत आहे. यात तेलगू स्टार विजय देवरकोंडासोबत ती दिसून येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जौहर करत आहे.