रामनगरः
गोवा हद्दीतून कर्नाटकात येत असलेल्या वाहनांची तपासणी अनमोड नाक्मयावर केली असता 577 लिटर दारू आढळून आली. सदर वाहनामध्ये केनी कंपनीच्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये भरण्यात आलेला दारूसाठा जप्त करण्यात आला.
या कारवाईत वाहनासह एकूण 17,81,864 रुपयांची मालमत्ता या चेकनाक्मयावर जप्त करण्यात आली आहे. तसेच हा दारूसाठा वाहतूक करणाऱया ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजस्थान भागातील वाहन अनमोड चेकनाक्मयावर आले असता तपासणी करण्यात आली. परंतु या वाहनावर पूर्वीचा नंबर पुसून हाताने नवीन नंबर घातल्याचा संशय पोलीस अधिकाऱयांना आल्याने वाहनाची तपासणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तर सदर वाहनावर टीएस 07 युएस 8995 क्रमांक असून सदर क्रमांक पकडण्यात आलेल्या वाहनाचा नसल्याची शंका दिसून येत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.