वार्ताहर/ रामनगर
अनमोड येथील तपासणी नाक्यावर शुक्रवारी गोवा येथून कर्नाटकात मारुती स्विफ्ट डिझायर (केए 25 एन 9442) कारची तपासणी केली असता 40.770 लीटर दारू तर 7500 लीटर गोवा फेनी असा एकूण 5 लाख 89.729 रुपयांचा मुद्देमाल वाहनासह जप्त करण्यात आला.
या बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी नागय्या वीरभद्रय्या पॅटीमठ, रा. धारवाड याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. सदर कारवाई अनमोड अबकारी उपनिरीक्षिका रेश्मा बानावळीकर, राजू भटकळ, खिराज नाईक आदींनी केली. या चेक नाक्यावर महिन्याभरात गोवा येथून कर्नाटकात येणाऱया वाहनांवर येथील उपनिरीक्षिका रेश्मा बानावळीकर यांनी करडी नजर ठेवून तीन वाहनांसह एकूण 1572.5 लीटर दारूसाठा जप्त केला असून याची किंमत 26,97,836 इतकी होते.