केंद्राकडून राज्यांना नव्या गाईडलाईन्स : विविध क्षेत्रांना चालना देण्याची सूचना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाचा संसर्ग सध्या नियंत्रणात असल्यामुळे आता केंद्र सरकारने नव्या अनलॉक गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. रुग्णसंख्या आटोक्मयात आल्याने इतर व्यवहारही सुरळीत करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांशी पत्रव्यवहार करत नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार शाळा, महाविद्यालये, रेस्टॉरंट, सिनेमागृह आणि व्यायामशाळा अशी विविध आस्थापने स्थानिक पातळीवरील कोरोना परिस्थितीचा अभ्यास करून सुरु करण्यास सांगितले आहे. तसेच सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, उत्सव इतर समारंभही सुरु करण्याबाबतही यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे.
केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांच्यामार्फत पाठविण्यात आलेल्या पत्रानुसार, मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. सचिवांनी या पत्रात राज्यातील तसेच जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची संख्या पॉझिटिव्हिटी रेट या साऱयाचा विचार करुन सुधारित नियम लागू करण्याची सूचना केली आहे. गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशांचा मूळ उद्देश हा देशातील विविध आर्थिक व्यवहार सुरळीत करणे हा आहे. कोरोना रुग्णसंख्या आटोक्मयात येत असल्याने आर्थिक व्यवहारही सुरळीत होणे गरजेचे असल्याचे मत पत्रात मांडण्यात आले आहे.
देशात नव्या रुग्णांमध्ये झपाटय़ाने घट
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी दिवसभरात देशात 13 हजार 166 नवीन रुग्ण आढळले असून 302 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापूर्वी बुधवारी 14 हजार 148 रुग्णांची नोंद झाली होती. म्हणजेच रुग्णसंख्येत घट झाली आहे. देशात गुरुवारी दिवसभरात 26 हजार 988 लोक बरे झाले आहेत. तसेच सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 34 हजार 235 इतकी झाली आहे. त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱयांची संख्या 5 लाख 13 हजार 226 झाली आहे. आतापर्यंत 4 कोटी 22 लाख 46 हजार 884 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
आतापर्यंत सुमारे 177 कोटी डोस
देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत, आतापर्यंत सुमारे 176 कोटी कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. गुरुवारी दिवसभरात 34 लाख 4 हजार 426 डोस देण्यात आल्यानंतर आतापर्यंत 176 कोटी 86 लाख 89 हजार 225 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.