ऑनलाईन टीम / देहरादून :
देशात अनलॉक 2 सुरू झाला आहे. त्या दरम्यान, उत्तराखंडात येणाऱ्या पर्यटकांना त्यांच्याकडे ते निगेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र असल्यास त्यांना प्रदेशात फिरण्यास परवानगी दिली जाईल. तसेच प्रदेशातील हॉटेलमध्ये ते राहू शकतील मात्र, यासाठी देखील त्यांना कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल, अशी माहिती उत्तराखंडाचे मुख्यमंत्री तिवेंद्र सिंह रावत यांनी दिली.
ते म्हणाले, अनलॉक 2 मध्ये राज्यात बऱ्याच सवलती दिल्या जात आहेत. यामध्ये प्रदेशवासियांसाठी चारधाम यात्रा सुरू करण्यात आली आहे. तसेच ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे, त्या भागाचा आढावा घेतला जात आहे.
या महामारीमुळे सामाजिक, आर्थिक आणि मानसिक समस्या उद्भवल्या आहेत.मागील दोन दिवसात कोरोना रुग्णांची संख्या स्थिर राहिली आहे तसेच त्यात घट देखील झाली आहे. ही घट अशीच होत रहावी त्या दिशेने आम्ही प्रयत्न करीत आहोत तसेच राज्यात येणाऱ्या सर्व लोकांचे चेकिंग करून त्यांच्या प्रवासाचा मागोवा घेतला जात आहे.