प्रतिनिधी / सातारा
अनवडी (ता. वाई) गावच्या हद्दीत शासकिय वनराईत झाडाला गळफास लावून घेऊन राजेश पोपट भोसले (वय 32, रा.भीमनगर भुईंज) याने आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संदेश पोपट भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजेश पोपट भोसले हा दि.23रोजी सकाळी 10.30 वाजता अनवडी गावच्या हद्दीत हॉटेल पंचरत्न शेजारी असलेल्या शासकीय वनराईत झाडाला ब्लॅंकेटच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची निदर्शनास आले. आत्महत्या केल्याचे कारण समजू शकले नाही मात्र, तो पेंटिंगची कामे करायचा.लॉक डाऊनमध्ये हाताला काम नव्हते.दोन दिवसांपूर्वी तो हॉटेलमध्ये कामाला जातो असे सांगून निघून गेला होता.हवालदार आवळे तपास करत आहेत.