पणजी प्रतिनिधी
थॉमस विन्टरबर्ग यांच्या ’अनादर राऊंड’ या चित्रपटाने 51 वा भारतीयआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. कान्स बेस्ट अ?Ÿक्टर अवॉर्ड विनर मॅड्स मिकेलसेन अभिनीत हा सिनेमा इफ्फीमध्ये दाखविण्यात येणार आहे. महोत्सवात ’मेहरूनिसा’ चा वर्ल्ड प्रीमियरसुद्धा पाहायला मिळणार आहे. संदीप कुमारचा हा चित्रपट मिड फेस्टचे प्रमुख प्रदर्शन करेल.
अभिनेता फारुख जाफर मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट एका महिलेच्या आजीवन स्वप्नाची कथा सांगतो. इफ्फीचा समारोप किओशी कुरोसावा लिखित ’वाईफ आ?फ स्पाय’ या ऐतिहासिक नाटकाच्या इंडिया प्रीमियरने होईल. सदर जपानी चित्रपटाला व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा रौप्य सिंह मिळाला आहे.