शेंद्रे येथील घटना ; जखमी कामागारावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू ;
प्रतिनिधी/ सातारा
शेंद्रे (ता.सातारा) येथील मॉलमध्ये मंगळवारी रिव्हॉल्वरच्या लेदरचे पाकीट बसवताना अनावधानाने पुण्याच्या व्dयाक्तीकडून गोळी सुटली आणि कामगार जखमी झाला. उलफिद युसुफ खान(रा. शेंद्रे) असे कामगाराचे नाव असून्न त्याला तात्काळ खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी दुपारच्या सुमारास शेंद्रे येथील मॉलमध्ये पुण्याचे व्यक्ती रिव्हॉल्वरचे लेदर पाकीट खरेदी करण्यासाठी आला होता. त्याने पाकीट खरेदी केले. या पाकीटात रिव्हॉल्वर बसताना रिव्हॉल्वर लोड झाली. आणि रिव्हॉल्वर खाली पडताच गोळी सुटली. ही गोळी थेट मॉलमधल्या कामगार उलफिद युसुफ खानच्या कमरेला लागली. यामुळे तो जखमी झाला. उलफिद जखमी झाल्याने संपूर्ण मॉलमध्ये खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, तालुका पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, डीबी पथकाचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. उलफिदला तात्काळ खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करून गोळी बाहेर काढण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सीसीटीव्ही फुटेज पेलिसांच्या ताब्यात
पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा सुरू केला. यावेळी मॉलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी दिली.