संशयितांच्या वकीलांनी या विसंगती न्यायालयासमोर आणल्याः या विसंगतीबाबत भंडारे यांने आपण कामटे यांना घाबरून काही गोष्टी सांगितल्या नसल्याच्sढ स्पष्ट केलेः मारहाण झाली असताना न्यायालयात मात्र त्यावेळी सांगितले नाही
प्रतिनिधी/सांगली
पोलीसांच्या थर्ड डिग्रीने मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या खूनप्रकरणांची मंगळवारी सलग दुसऱया दिवशीही सुनावणी झाली. यामध्ये कोथळे याचा सहकारी आणि या गुन्हÎातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अमोल भंडारे याची उलटतपासणी संशयित आरोपीच्या वकीलांनी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांच्यासमोर घेतली. यामध्ये तपासातील अनेक विसंगती त्यांनी न्यायालयासमोर आणल्या. तसेच अमोल भंडारे यांने एकूण सहा जबाब दिले आहेत. त्यातील अनेक जबाबात मोठÎा विसंगती आहेत त्याही न्यायालयासमोर आणण्यात आल्या. या विसंगती उलटतपासणी करणाऱया वकीलांनी अमोल भंडारे याच्याकडून वदवून घेतल्या.
सोमवारी सरकारी पक्षातर्फे उज्ज्वल निकम यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अमोल भंडारे याची साक्ष काढली. या साक्षीमध्ये त्यांने संशयित आरोपी तत्कालिन पोलीस अधिकारी युवराज कामटे, पोलीस हवालदार अनिल लाड, अरूण टोणे, नसरूद्दिन मुल्ला, राहूल शिंगटे आणि झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले यांनी अनिकेत कोथळे याचा खून सांगली शहर पोलीस ठाण्यातील कोठडीत केला व त्यानंतर हा मृतदेह अंबोली घाटात निर्जनस्थळी नेवून पेट्रोल टाकून जाळून टाकल्याचा जबाब दिला होता. या जबाबानंतर मंगळवारी या जबाबावरून संशयितांच्या वकीलांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अमोल भंडारे याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करून त्याला चांगलेच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याच्या बोलण्यातून आलेल्या विसंगती आणि प्रत्यक्षात कागदावर असणारे शब्द यामध्ये फरक असल्याचे वकीलांनी यावेळी न्यायालयासमोर आणले.
अमोल भंडारे याची उलटतपासणी ऍड. किरण शिरगुप्पे, ऍड प्रमोद सुतार आणि विकास पाटील यांनी घेतली. बुधवारी ऍड. सी.डी. माने आणि ऍड. गिरीश तपकिरे हे घेणार आहेत.