चेस्टर ली स्ट्रीट : भारत आणि कौंटी सिलेक्ट इलेव्हन यांच्यातील तीन दिवसांचा सरावाचा सामना अनिर्णित अवस्थेत संपला. इंग्लंडच्या दौऱयावर असलेल्या भारतीय संघाचा हा कसोटीआधी पहिला सरावाचा सामना होता. अष्टपैलू रविंद्र जडेजाने या सामन्यात दोन्ही डावात अर्धशतके झळकविली. अगरवाल आणि विहारी यांची फलंदाजी बऱयापैकी झाली.
या सामन्यात भारताचा पहिला डाव 311 धावांत आटोपल्यानंतर कौंटी सिलेक्ट इलेव्हन संघाचा पहिला डाव 220 धावांत संपुष्टात आल्यामुळे भारताने 91 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर भारताने आपला दुसरा डाव 3 बाद 192 धावांवर घोषित करून कौंटी सिलेक्ट इलेव्हन संघाला विजयासाठी 284 धावांचे आव्हान दिले. भारताच्या दुसऱया डावात रविंद्र जडेजाने 77 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 51 धावा जमविल्यानंतर जडेजा निवृत्त झाला.
संक्षिप्त धावफलक : भारत प. डाव- 311, कौंटी सिलेक्ट इलेव्हन प. डाव- सर्वबाद 220, भारत दु. डाव- 3 बाद 192, डाव घोषित, (जडेजा 51, हनुमा विहारी नाबाद 43, अगरवाल 47, पुजारा 38), कौंटी सिलेक्ट इलेव्हन दु. डाव- 15.5 षटकात बिनबाद 31.