वेंगुर्ले प्रतिनिधी:
वेंगुर्ले शहरातील विठ्ठलवाडीमधील रहिवासी अनिल दशरथ तोरस्कर (62) यांचे गुरुवार दि. 22 जुलै रोजी पहाटे वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना ह्दयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, बहिण, भावोजी, पुतणे, पुतणी, भाचा, असा परीवार आहे. वेंगुर्ले विठ्ठलवाडी येथील इलेक्ट्रीशियन बाळा सातोस्कर यांचे ते मावस भाऊ होत.