मुंबई/प्रतिनिधी
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील अंतर्गत चौकशीची कागदपत्रे लीक केल्याप्रकरणी स्वतःच्याच अधिकाऱ्याला अटक केली आहे. त्याच बरोबर देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनाही अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, याआधी बुधवारी रात्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेतल्यानंतर आता त्यांची चौकशी नंतर सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. चतुर्वेदी यांची सीबीआयने चौकशी करुन त्यांची सुटका केली आहे. चतुर्वेदी वरळीतील सुखदा या इमारतीमधून बाहेर पडल्यानंतर त्यांना वरळी सी लिंक परिसरात सीबीआयने ताब्यात घेतलं होतं. अनिल देशमुख यांचे वकिल आनंद डागा यांनाही सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली होती.