ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 14 दिवसांची म्हणजेच 29 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी देशमुख यांना 12 नोव्हेंबपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांची कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश ईडीने दिले होते. आज न्यायालयाने देशमुखांना 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, देशमुख यांना पाठीचा त्रास असल्याने त्यांना जमीनवर झोपताना त्रास होतो. त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बेडची मागणी मान्य करावी. त्यांच्यावर खासगी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार व्हावेत, तसेच औषधे पुरविण्यात यावी असा अर्ज देशमुख यांच्या वकीलांनी केला. त्यावर न्यायालयाने अनिल देशमुखांना वैद्यकीय उपचार, औषध आणि बेडची परवानगी दिली आहे. मात्र, घरचे जेवण देण्यासाठी न्यायालयाने मंजुरी दिली नाही.