मुंबई \ ऑनलाईन टीम
माजी केंद्रीय गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूद्ध खंडणी व भ्रष्टाचाराच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने महाराष्ट्रातील १२ ठिकाणी छापे टाकले. मंगळवारी रात्री सुरू झालेल्या आणि बुधवारी सकाळपर्यंत सुरू असलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांचा मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सांगली आणि अहमदनगर या ठिकाणी छापे टाकल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आणि अहमदनगरमधील सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील आणि पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांच्याशी संबंधित असलेल्या जागेचा या प्रकरणातील संशयित मधस्थांकडून शोध घेण्यात आला.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस उपनिरीक्षक सचिन वाझे यांच्याकडे १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्राद्वारे केला होता. त्या पत्रात एसीपी संजय पाटील व उपायुक्त राजू भुजबळ यांच्या नावाचा उल्लेख होता. भुजबळ यांच्या संगमनेर येथील घरावर ईडी अधिकाऱ्यांनी छापा घातला. सकाळी साडेनऊ ते साडेबारा अशी तीन तास चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.