ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापोली येथील रिसॉर्ट पाडण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. महाराष्ट्र कोस्टल झोन अथॉरिटीने यासंबंधी माहिती दिल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन सांगितले.
अनिल परब यांनी काही जणांशी संगनमत करुन बेकायदेशीरपणे दापोली येथील साई रिसॉर्ट आणि सी शंख रिसॉर्ट बांधले. सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून बनावट कागदपत्रे आणि आवश्यक पुरावे तयार केले. किरीट सोमय्या यांनी हे बेकायदेशीर रिसॉर्ट पाडण्यासाठी पाठपुरावा केला होता. सोमय्या यांच्या मागणीला यश आले असून, बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणी परब यांच्यावर पर्यावरण कायदा कलम 15 आणि 19 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. तसेच यासंबंधी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश केंद्र सरकारने महाराष्ट्र कोस्टल झोन अथॉरिटीला दिले आहेत.