ऑनलाईन टीम / मुंबई :
भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. तसेच किरीट सोमय्या यांना कायदेशीर नोटीस पाठवल्याची माहिती अनिल परब यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
दापोलीतील रिसॉर्टवरुन अनिल परब यांच्यावर सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. याप्रकरणी सोमय्या यांना 72 तासात माफी मागण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी सोमय्या यांनी माफी न मागितल्याने परब यांनी मुंबई उच्च न्यायालयात सोमय्यांविरोधात तब्बल 100 कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. दरम्यान, परब यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये 100 कोटीच्या दाव्यासोबतच विनाअट माफीची मागणी केली आहे. तसेच सोमय्या यांनी माफी मागून ती दोन वर्तमानपत्रांमध्ये छापून आणावी, असेही परब यांनी म्हटले आहे.