प्रतिनिधी / कोल्हापूर
विश्वविक्रमवीर अनुप्रिया गावडेला सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार व निती आयोग पुरस्कृत नॅशनल फाउंडेशनच्यावतीने भारताचा प्रतिष्ठित भारत भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा भोपाळ मध्यप्रदेश येथे होणार आहे. ती शांतिनिकेतन स्कूल मध्ये इयत्ता चौथीत शिकत असून शैक्षणिक, क्रीडा,सांस्कृतिक अशा क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या देशातील प्रतिष्ठित व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो.भारतीय घटनेतील 35 कलमे व उपकलमे तोंडपाठ करून विश्वविक्रम करणाऱ्या अनुप्रिया गावडेला यापूर्वीही अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
आज पर्यंत अनुप्रियाला आठ प्रादेशिक, दोन राज्यस्तरीय व 8 राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय सामान्य ज्ञान परीक्षेत तिने जगात अकरावा,गणित ऑलिंपियाड परीक्षेत जगात आठवा,आय क्यू ऑलिंपियाडमध्ये देशात दहावा,बीडीएस परीक्षेत देशात सतरावा,इंग्रजी ओलंपियाड मध्ये गोवा व महाराष्ट्र झोन मध्ये प्रथम क्रमांक असे देदीप्यमान यश प्राप्त केले असून,आजपर्यंत विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय परीक्षेत अनेक सुवर्णपदक व रौप्य पदक तिने पटकावले आहे.तिला वक्तृत्व विशेष आवड असून ती भारताची लिटिल सुपर स्पीकरही आहे.
त्या सोबत जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत तिला कास्य पदक मिळाले असून, भरतनाट्यम लाटीकाटी गिटार व पियानो वादनही ती शिकत आहे. शांतिनिकेतन शाळेच्या संचालिका, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन व आई प्रा,अक्षता गावडे व वडील अमितकुमार गावडे यांचे प्रोत्साहन लाभले तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.