ऑनलाईन टीम / मुंबई :
प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवाल याचे वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी निधन झाले आहे. मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे आदित्यचे निधन झाले असल्याची बाब समोर येत आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान शनिवारी पहाटे त्याने अखेरचा श्वास घेतला.
आदित्य हा म्युझिक अरेंजर, निर्माता म्हणून कलाविश्वात काम करत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अटी, नियमांचे पालन आदित्यवर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
आदित्य पौडवाल यांनी आपली आई अनुराधा पौडवाल यांच्यासारखी बरीच भजनेही गायली आहेत. भारताचा सर्वात तरुण संगीत दिग्दर्शक म्हणून त्याच्या नावाचा समावेश ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे चित्रपटातील साहेब तू या गाण्याचा प्रोफेसर म्हणून आदित्यने काम केले होते.
दरम्यान, 2020 वर्षात अनेक वाईट बातम्या समोर आल्या. इम्रान खान, ऋषी कपूर, सुशांत सिंह राजपूत, वाजिद खान आदी कलाकारांचे निधन झाले आहे.