प्रतिनिधी / बेळगाव
अनुरूप विवाह संस्था पुणेची शाखा बेळगावमध्ये आदर्शनगर, वडगाव येथे रोहिणी कुलहळ्ळी यांच्या निवासस्थानी सुरू झाली आहे. या शाखेचे उद्घाटन अनुरूपच्या संचालिका गौरी कानिटकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी त्या म्हणाल्या, आजकाल बदलत्या वातावरणात कुटुंब संस्था सक्षम करण्याची अत्यंत गरज असून, अनुरूप ही संस्था त्यासाठी गेल्या 45 वर्षांपासून कार्यरत आहे. संस्थेच्या बारा शाखा असून, दर महिन्याला अनुरूपद्वारे 550 ते 600 विवाह ठरतात. वधू-वरांचे मेळावे आयोजित करणे हे संस्थेचे वैशिष्टय़ आहे. केवळ लग्न जमविणे हे अनुरूपचे उद्दिष्ट नसून ते रुजविणे, फुलविणे व टिकविणे हा अनुरूपचा ध्यास आहे. बेळगाव शाखेच्या प्रमुख रोहिणी कुलहळ्ळी यांनी स्वागत करून गौरी कानिटकर यांचा सत्कार केला.