मंत्री श्रीनिवास पुजारी यांची माहिती
बेंगळूर : अनुसूचित जातीसाठी घरे बांधण्यासाठी राज्य सरकारकडून देण्यात येणारे प्रोत्सहनधन 1.75 लाख रुपयांवरून 5 लाखापर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती समाज कल्याणमंत्री कोटा श्रीनिवास पुजारी यांनी दिली. सोमवारी बेंगळूरच्या विकाससौध येथे समाज कल्याण खात्यातील अधिकार्यांशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यातील अनुसूचित जातीतील लोकांना घरे बांधण्यासाठी राज्य सरकारकडून 1 लाख 75 हजार रुपये प्रोत्सहनधन दिले जात आहे. मात्र, इतक्या कमी रकमेतून घरे बांधणे कठीण आहे. सर्व गरिबांना घर, स्वच्छतागृह, वीज कनेक्शन व इतर पायाभूत सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. या कारणासाठी हे प्रोlसाहनधन 5 लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री बसवराज बोमाई आणि अर्थखात्यात्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.