का म्हणतात याला मून लेक?
भारतातील अनेक ठिकाण देश तसेच विदेशातील पर्यटकांना आकर्षित करत असतात. भारतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नैसर्गिक सौंदर्य दिसून येते. अशाच ठिकाणांमध्ये सामील आहे हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पीति हा दुर्गम जिल्हा. येथील नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. पर्यटकांना येथील सुंदर दऱया, ग्लेशियर आणि उंच पर्वत आकर्षित करतात. येथील सुंदर सरोवरे सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र आहेत.
येथील चंद्रताल सरोवर उत्तम कॅम्पिंग साइट असल्याचे मानले जाते. या सरोवराला द मून लेक या नावानेही ओळखले जाते. जगातील सर्वात सुंदर सरोवरांमध्ये सामील चंद्रताल सरोवर समुद्रसपाटीपासून 14,100 फुटांच्या उंचीवर आहे. हिवाळा सुरू होताच येथे हिमवृष्टी होऊ लागल्याने हे ठिकाण 3-4 महिन्यांसाठी बंद केले जाते.
अत्यंत विशेष सरोवर
या सरोवरातील पाण्याचा रंग एका दिवसात तीनवेळा बदलतो. या सरोवराला ‘मीठे पानी की झील’ या नावानेही ओळखले जाते. हे सरोवर लाहौल-स्पीतिच्या स्थानिक लोकांसाठी धार्मिक महत्त्व बाळगून आहे.
हे सरोवर स्पीति आणि कुल्लू खोऱयापासून काही अंतरावर आहे. हे सरोवर अर्धचंद्राप्रमाणे दिसून येत असल्याने लोक याला द मून लेक म्हणजेच चंद्राचे सरोवर असेही म्हणतात. या सरोवराचे पाणी अत्यंत स्वच्छ असल्याने ते काचेसारखे चमकते. सरोवराचे हे क्षेत्र एकेकाळी स्पीति आणि कुल्लू येथे जाणाऱया तिबेट आणि लडाखच्या व्यापाऱयांचे महत्त्वाचे स्थान होते.