दोडामार्ग न.प. प्रभाग आरक्षण : नगराध्यक्षांचा मतदारसंघ सर्वसाधारणसाठी राखीव
नानचेंचा मतदारसंघ यावेळी
ओबीसी महिला राखीव
वार्ताहर / दोडामार्ग:
कसई-दोडामार्ग नगर पंचायत निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण मंगळवारी जाहीर झाले. कुडाळच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील महाराजा हॉलमध्ये आरक्षण सोडत काढण्यात आली. नव्या आरक्षणाचा अनेक विद्यमान नगरसेवकांना फटका बसला आहे.
प्रभाग एक – महिला सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 1 महिला सर्वसाधारणसाठी आरक्षित झाला आहे. मागील निवडणुकीवेळी हा प्रभाग सर्वसाधारण व्यक्तीसाठी आरक्षित होता. तेथून मनसेचे रामचंद्र ठाकुर 26 मते घेऊन निवडून आले होते.
प्रभाग क्रमांक 2 – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 2 सर्वसाधारणसाठी आरक्षित झाला आहे. मागील निवडणुकीत हा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होता. त्यावेळी भाजपच्या वैष्णवी विष्णू रेडकर 65 मते घेऊन निवडून आल्या होत्या.
प्रभाग क्रमांक तीन – ओबीसी
प्रभाग क्रमांक तीन ओबीसीसाठी आरक्षित झाला आहे. मागील निवडणुकीत हा प्रभाग सर्वसाधारण महिला गटासाठी होता. या प्रभागातून काँग्रेसच्या उपमा गावडे 40 मते घेऊन निवडून आल्या होत्या.
प्रभाग क्रमांक चार – ओबीसी महिला
प्रभाग क्रमांक चार ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाला आहे. हा प्रभाग सर्वसाधारणसाठी होता व तेथून काँग्रेसतर्फे संतोष नानचे 55 मते घेऊन निवडून आले व पहिल्या नगराध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती.
प्रभाग क्रमांक पाच – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक पाच सर्वसाधारणसाठी आरक्षित झाला आहे. मागील वेळी हा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होता व येथून काँग्रेसच्या विनया म्हावळंकर 57 मते घेऊन विजयी झाल्या होत्या.
प्रभाग क्रमांक सहा – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक सहा सर्वसाधारण व्यक्तीसाठी आरक्षित झाला आहे. मागील वेळी हा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या साक्षी कोरगावकर 70 मते घेऊन विजयी झाल्या व त्यांची प्रथम उपनगराध्यक्षपदी निवड झाली होती.
प्रभाग क्रमांक सात – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक सात सर्वसाधारणसाठी आरक्षित झाला आहे. हा प्रभाग ओबीसी महिलांसाठी राखीव होता व तेथून शिवसेनेच्या संध्या प्रसादी 107 मते घेऊन निवडून आल्या होत्या.
प्रभाग क्रमांक 8 – ओबीसी
प्रभाग क्रमांक 8 ओबीसीसाठी आरक्षित झाला आहे. मागील वेळी हा प्रभाग सर्वसाधारणसाठी आरक्षित झाला होता. त्यावेळी शिवसेनेचे दिवाकर गवस 66 मते घेऊन निवडून आले होते.
प्रभाग क्रमांक 9 – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 9 हा सर्वसाधारणसाठी आरक्षित झाला आहे. मागील वेळी हा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होता व तेथून विद्यमान नगराध्यक्षा लीना कुबल शिवसेनेतर्फे 80 मते घेऊन निवडून आल्या होत्या.
प्रभाग क्रमांक 10 – ओबीसी महिला
प्रभाग क्रमांक 10 ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाला आहे तर मागील वेळी सर्वसाधारणसाठी होता. त्यावेळी भाजपचे विद्यमान उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण 52 मतांनी निवडून आले होते.
प्रभाग क्रमांक 11 – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 11 सर्वसाधारणसाठी आरक्षित झाला होता. मागील वेळी हा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला होता व तेथून शिवसेनेच्या सुषमा मिरकर या 60 मतांनी निवडून आल्या होत्या.
प्रभाग क्रमांक 12 – हा सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 12 हा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे तर मागील वेळी अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण जाधव हे 43 मतांनी विजयी झाले होते.
प्रभाग क्रमांक 13 – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 13 सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे तर मागील वेळी ओबीसीसाठी राखीव होता. त्यावेळी भाजपचे प्रमोद कोळेकर 54 मतांनी विजयी झाले होते.
प्रभाग क्रमांक 14 – महिला एससी
प्रभाग क्रमांक 14 महिला एससीसाठी आरक्षित झाला आहे. मागील वेळी ओबीसी महिलांसाठी आरक्षित होता. त्यावेळी काँग्रेसच्या हर्षदा खरवत 81 मतांनी निवडून आल्या होत्या.
प्रभाग क्रमांक 15 – सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 15 सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे. मागील वेळी ओबीसी महिलांसाठी होता. त्यावेळी भाजपच्या रेश्मा कोरगावकर 66 मतांनी विजयी झाल्या होत्या.
प्रभाग क्रमांक 16 सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक 16 सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे. मागीलवेळी ओबीसीसाठी होता व त्यावेळी भाजपचे सुधीर पनवेलकर हे 67 मते घेऊन निवडून आले होते.
प्रभाग क्रमांक 17 – ओबीसी महिला
प्रभाग क्रमांक 17 ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाला आहे. मागील वेळी सर्वसाधारणसाठी होता. त्यावेळी शिवसेनेचे संतोष मावळंणकर 43 मते घेऊन निवडून आले होते.
चिठ्ठय़ांद्वारे आरक्षण प्रक्रिया
आरक्षण प्रक्रिया चिठ्ठय़ाद्वारे करण्यात आली. दोडामार्ग शहरातील प्राथमिक शाळा क्रमांक एकमधील चिन्मयी जयसिंग खानोलकर व राकेश बसुराज नाईक या दोन चिमुकल्यांनी चिठ्ठय़ा काढल्या. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून वंदना खरमाळे, तहसीलदार अरुण खानोलकर, निवासी नायब तहसीलदार श्रीधर पाटील, मुख्याधिकारी शिवराज गायकवाड, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.