पालिका प्रशासनाला दिला निवेदनाद्वारे इशारा
प्रतिनिधी/ सातारा
सातारा नगरपालिकेमधील सदर बाजार येथील मागासवर्गीय वसाहती मधे लाखो रुपये खर्चून समाज मंदिर बाधंले. विशेषताः समाज मदिंरावर दोन वेळा रगंरंगोटी केली. तरी ही समाज मंदिर अद्याप तेथील लोकांच्या ताब्यात दिले नाही, लवकरचल लोकार्पण करण्यात यावे, अन्यथा रिपाइं उद्घाटन करेल असा इशारा रिपाइने नगराध्यक्षा माधवी कदम यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदन देताना रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ व इतर उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सदर बाजार येथील मिलिंद काँलनी येथील लोकांना सास्पृंतिक कार्यक्रम व कोणते ही समाज कार्य करण्यास जागा नाही. महिलाना मिटींग किवां बैठक, मेळावासाठी जागा नाही, विशेष म्हणजे जरंडेश्वर नाका मिलिदं काँलनी येथे डाँ बाबासाहेब आंबेडकरांच्या मातोश्रींचे भिमाई स्मारकाचे दर्शन घेण्यासाठी अनेक लोक बाहेर गावावरून येतात. तेथील काम सुरू असलेने मिलिदं काँलनीतील समाज मंदिराचा स्मारकात येणाऱया लोकांना ही फायदा होईल तरी संबधित समाज मंदीर त्वरीत लोकासाठी खुले करा अन्यथा रिपाई ए लोकार्पणासाठी उद्घाटन करेल, असा इशारा दिला आहे.