प्रतिनिधी / कोल्हापूर
गेल्या वर्षभरापासून संपुर्ण देश कोराना विषाणूमुळे संकटात आहे. अशा कठीण काळामध्ये सर्वसामान्य लोकांचे जीवन अत्यंत कठीण झालेले आहे. आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. संकटकाळामध्ये जनतेला दिलासा देण्याऐवजी सध्या राज्यात लाŸकडाऊन काळातील वाढीव वीज बिल गोळा करण्यासाठी हे वसुली सरकार जोरदार प्रयत्न करत आहे. या सरकारने अन्यायकारण वीजबिल वसुली तातडीने थांबवावी, असे आवाहन भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्यासह पदाधिकाऱयांनी केले आहे. महावितरणाचा कुणी अधिकारी जर वीज कनेक्शन तोडण्यास आला तर भाजपच्या पदाधिकाऱयांना फोन करा आम्ही तेथे येऊन वीज तोडणी थांबवू, असेही चिकोडे यांनी म्हटले आहे.
या संदर्भात निवेदनात म्हटलो आहे, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात लाŸकडाऊन काळातील वाढीव वीज बिलाबाबत ग्राहक आा†ण महा†वतरण यामध्ये संघर्ष सुरू आहे. शनिवारी कोल्हापुरात एका ग्राहकाने महा†वतरणचे कर्मचारी वीज तोडणीसाठी आले असता आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही अत्यंत गंभीर बाब आहे. लोकशाहीत खासगी सावकारीलाही लाजवेल अशा पद्धतीने महा†वतरण कंपनी वीज तोडणी करत आहे. शाहू महाराजांच्या नगरीत अशा पद्धतीने एका नागा†रकाला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागते ही शरमेची बाब आहे. एकीकडे महाआघाडी सरकार मधील गृहमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, दररोज एक दोन आ†धकारी मोठय़ा प्रमाणावर लाच घेताना सापडत आहेत. हे सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरलेले आहे.
कोल्हापूर शहर व जिह्यातील सुरु असलेली अन्यायकारक वीज तोडणी थांबवली नाही व यात सर्व सामान्य नागरीक आत्महत्या सारखे प्रकार करताना दगावले गेले तर याची पूर्ण जबाबदारी महाविकास आघाडी सरकार, प्रशासन व महावितरण कंपनी यांची असेल तसेच अशा पद्धतीची गंभीर घटना घडल्यास भारतीय जनता पार्टी संबंधीता विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करेल, असा इशारा या निवेदनात दिला आहे.
संघर्षाची वेळ येऊ देऊ नका
सावकारकी स्टाईलची वीज बिल वसुली करण्यासाठी येणाऱया महा†वतरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबर आम्हाला संघर्ष करण्याची वेळ येऊ नये, याची खबरदारी घ्यावी, असा इशारा चिकोडे यांनी सरकारला दिला आहे.
भाजपच्या कार्यालयात संपर्क करा
महावितरणचे कर्मचारी वीज कनेक्शन तोडणीसाठी दारात आले तर नागरिकांनी भारतीय जनता पार्टीशी संपर्क साधावा. भाजपा पदाधिकारी त्या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन वीज तोडणी थांबवतील. भाजपा कार्यालय फोन (0231-2548103)