अतुल कुलकर्णी यांचा चित्रपट
‘अन्य’ हा चित्रपट हिंदी कलाकारांसह दिग्गज मराठी कलाकारांनी नटलेला आहे. या चित्रपट 10 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘अन्य’ चित्रपटातील गाणी मराठी आणि हिंदी भाषेत प्रेक्षकांसाठी यापूर्वीच सादर करण्यात आले आहे. हा चित्रपट सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर प्रकाश टाकणारा आहे.
या चित्रपटाने यापूर्वीच अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविले आहेत. स्वीडनमध्ये एल्विसबिन चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट तर फाल्कन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट पिक्चर स्पेशल शेणीचा पुरस्कार मिळाला आहे.
डॉ. सिमी जोसेफ यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून त्यांनीच दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अतुल कुलकर्णी दिसून येतील तर राइमा सेनने या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आहे. या चित्रपटात प्रथमेश परब दिसून येणार आहे. यातील एक गाणे हे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना समर्पित करण्यात आले आहे.
हा चित्रपट मानवी तस्करी आणि वेश्यावृत्ती यासारख्या अनेक सामाजिक मुद्दय़ांवर प्रकाश टाकणार आहे. आम्ही प्रेक्षकांना समाजाच्या सत्याची ओळख करून देणार आहोत असे सिमी जोसेफ यांनी म्हटले आहे. पॅनोरमा स्टुडियो देशभरात याची हिंदी आवृत्ती प्रदर्शित करणार आहे. तर पिकल एंटरटेनमेंट मराठी भाषेतील चित्रपट प्रदर्शित करणार आहे.