प्रतिनिधी /बेळगाव :
माध्यान्ह आहार तपासणीकडे अधिकाऱयांचे दुर्लक्ष होत असताना तालुका पंचायतचे कार्यकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी सांबरा येथील मराठी प्राथमिक शाळेला भेट देवून जेवणाचा दर्जा तपासला. यावेळी त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांसमवेश आहाराचा आस्वाद घेतला. संबंधितांनी त्यांनी सुचनाही केल्या आहेत.
सध्या दहावीच्या परीक्षांना लवकरच सुरुवात होणार आहे. त्यासाठी जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून वर्गखोल्या करुन विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात येत होते. त्यासाठी वीज पुरवठा आणि इतर सर्व सुविधा पुरविण्यासाठी साऱयांना सुचना करण्यात आल्या होत्या. गरीब विद्यार्थ्यांनी याचा लाभही झाला. आता मात्र कलादगी यांनी पुन्हा विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळते की नाही, यासाठी पाऊल उचलले आहेत.
तालुका पंचायतमधील कार्यभाराला रुळावर आणत असताना तालुक्मयातील समस्या सोडविण्याकडेही त्यांनी लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना योग्य जेवण मिळते की नाही, याचा विचार गांभीर्याने घेत विविध शाळांनी ते भेटी देणार आहेत. कोरोना व्हायरसमुळे परीक्षा तातडीने घेण्यात येत असताना त्यांच्या आहाराची काळजीही घेण्याकडे लक्ष देण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी पिडीओ मुत्तु बरगी यांनाही त्यांनी सुचना केल्या आहेत.