माटवेमळ-शेळप येथील घटना
वार्ताहर /खोल
माटवेमळ-शेळप येथे गेले काही दिवस तिन्हीसांजेच्या तसेच रात्रीच्या वेळी बिबटय़ाचा धुमाकूळ सुरू होता. अनेक पाळीव प्राण्यांना त्यांने तोंडघशी पाडले होते मात्र रविवारी रात्री 11च्या दरम्यान शेळप येथील गोविंद भिसो वेळीप याच्या घरात बिबटय़ा शिरण्याची घटना घडली. गोविंदच्या पत्नीने प्रसंगावधान राखून या बिबटय़ाला खोलीत जेरबंद केले.
उपलब्ध माहिती प्रमाणे, रात्री अकराच्या सुमारास वेळीप यांचा पाळीव कुत्रा भुंकू लागल्याने गोविंद यांची पत्नी गौरीने दरवाजा उघडला. यावेळी एका खोलीत मुले अभ्यासात दंग तर बाहेरच्या व्हरांडय़ात पती गोविंदने अंग टेकलेले होते. उघडय़ा दरवाजातून कुत्रा आत शिरला व पाठोपाठ कुत्राचा पाठलाग करणारा बिबटय़ा तडक खोलीत शिरला. बाहेर असलेल्या पत्नीने त्याच वेळी प्रसंगावधान राखून बाहेरून दाराला कडी घालून बिबटय़ाच्या मुसक्मया आवळल्या. एका बाजूने खोलीत आतमध्ये मुले तर बाहेर पती-पत्नी. अशा अवस्थेत वन खात्याला पाचारण करण्यात आले व त्यांनी पिंजारा लावून बिबटय़ाला बंदीस्त केले व हत्तीपावल येथे रवानगी करण्यात आली.
12 वर्षापूर्वी पारयेकट्टा-खोला येथे 8 जून 2009 रोजी रंगावती पुतू वेळीप हिला जबर जखमी केले होते. जखमी अवस्थेतही तीने प्रसंगावधान राखून घरात शिरलेल्या बिबटय़ाला दाराची कडी घालून जेरबंद केले होते. या घटनेची पुनरावृत्ती व स्मरण रविवारच्या या घटनेने होत असून गौरी गोविंद (कापसो) वेळीप हिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. गौरी हिच्या बाबतीत तसा प्रकार सुदैवाने घडला नसून व्हरांडय़ात अंग टेकलेल्या पतीला काहीच कल्पना मिळण्यापुर्वीच वाघाला जेरबंद करण्यास गौरी यशस्वी झाली.
दरम्यान, खोला पंचायत क्षेत्रात दोन बिबटय़ा मादींना पकडण्याचा विक्रम दोन्ही महिलाना जात असून गौरी हिचा सन्मान करण्यास कोण पुढे येतो यावर सर्वाची नजर खिळली आहे.