जीवच टांगणीला 3 वेळा लँडिंग फेल – तासभर आकाशात घिरटय़ा
वृत्तसंस्था/ जैसलमेर
अनेकदा कधीच कल्पना न केलेला प्रकार घडत असतो. अहमदाबाद-जैसलमेरच्या एका विमानात बसलेल्या प्रवाशांसोबत असेच काहीसे घडले आहे. स्पाइसजेटची नियमित विमानसेवा अहमदाबादहून जैसलमेर येथे प्रवाशांना नेत होती. पण स्पाइसजेटचे विमान तांत्रिक कारणांमुळे जैसलमेर विमानतळाच्या धावपट्टीवर लँड करू न शकल्याने प्रवाशांचा जीवच टांगणीला लागला. वैमानिकाने तीनेवळा प्रयत्न करूनही लँडिंग करता आले नाही.
यामुळे सुमारे तासभर विमान आकाशात घिरटय़ा घालत राहिले. तर प्रवाशांमध्ये घबराट पसरली, काही प्रवासी रडू लागल्याने विमान परत अहमदाबाद येथे आणले गेले आणि तेथे सुरक्षित लँडिंग करण्यात आले आहे.
सुमारे 2 तासांनी विमानाला दुसऱया वैमानिकाद्वारे जैसलमेर येथे पाठविण्यात आले. रात्री उशिरा जैसलमेरच्या धावपट्टीवर विमान सुरक्षित लँड झाले आहे. तांत्रिक कारणांमुळे या विमानाचे आधी तेथे लँडिंग होऊ शकले नव्हते. या सर्व प्रकारादरम्यान महिला प्रवाशांना रडू कोसळले होते.