पाणी पुरवठा सभापती सौ. सीता हादगे यांच्या सुचनेमुळे काम मार्गी
प्रतिनिधी/ सातारा
गेल्या सहा दिवसांपासून रविवार पेठेतील पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. त्याबाबत नागरिकांनी नगरसेवक श्रीकांत आंबेडर यांच्याकडे तक्रार केली. त्यावरुन आंबेकर यांनी पाणी पुरवठा सभापती सीता हादगे यांनी पाणी पुरवठा विभागास सुचना देताच 24 तासाच व्हॉल्व्हमधून अडकलेली शॉम्पूची बाटली बाहेर काढण्यात यश आले. प्रभाग सहा मध्ये आता पाणी पुरवठा सुरळीत होईल. दरम्यान, शहरातील नागरिकांनी पाण्याच्या टाक्यांमध्ये प्लॉस्टिकच्या बाटल्या व इतर साहित्य टाकू नये, असे आवाहन पाणी पुरवठा सभापती सीत हादगे यांनी केलेले आहे.
सातारा शहरातील प्रभाग 6 मध्ये सर्वोदय कॉलनी, क्षीरसागर कॉलनी आणि कैकाडी गल्लीत गेल्या सहा दिवसांपासून पाणी टंचाई निर्माण झाली होती. पाणी टंचाई होवू नये म्हणून नगरसेवकांनी खाजगी टँकरने पाणी पुरवठा सुरु करत पाणी पुरवठा सभापती सीता हादगे यांच्याकडे तक्रार जाताच त्यांनी पाणी पुरवठा विभागास ही समस्या सोडविण्यासाठी सुचना दिल्या. त्यानुसार प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जावून सीता हादगे यांनी काम करणाऱया कर्मचाऱयांना सुचित केले. काल सायंकाळीही शोध घेण्याचे सुरुच होते. आज सकाळी बगाडे हॉस्पिटल चौकात व्हॉल्व्हच्या ठिकाणी खुदाई करुन तपासणी केली असता व्हॉल्व्हमधून शॉम्पूच्या बाटली, पाऊच निघाले अन् पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आला.
याबाबत पाणी पुरवठा सभापती सीता हादगे यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की सातारा शहरातील पाणी पुरवठा करण्यासाठी ज्या वितरण टाक्या आहेत. त्याच्यामध्ये पाण्याचा प्लास्टिक बाटल्या व इतर अनुषंगिक साहित्य टाकू नये, त्यामुळे शहरातील वितरण नलिकेत व्यत्यय निर्माण होवून नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. पाईपलाईन चोकअप झाल्याने हे चोकअप काढण्यासाठी नवीन झालेले रस्ते फोडावे लागत आहेत. तरी नागरिकांनी पाणी वितरण टाकीच्या परिसरात अथवा पाण्याच्या वितरण टाकीमध्ये कोणतीही वस्तू टाकयू नये. तसेच केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेच्यावतीने मुख्याधिकारी अभिजीत बापट, पाणी पुरवठा सभापती सीता हादगे, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगराध्यक्ष माधवी कदम यांनी केले आहे.
दोन नळकऱयांची भूमिका महत्वाची
शहरातील रविवार पेठेतील पाण्याच्या समस्येबाबत स्वतः पाणी पुरवठा सभापती सीता हादगे या कार्यतत्परतेने सुचना देवून पाहणी करत होत्या. त्यामुळे नळकरी असलेले संजय घाडगे व संतोष घाडगे या दोघांनी मेहनत घेतली. त्याच बरोबर पाणी पुरवठा विभागाचे संदीप सावंत, तारेकश्वर बावणे, नंदकुमार कांबळे यांनी प्रयत्न केले. त्याबद्दल रविवार पेठेतील बलभिम शिंगरे, महेश क्षीरसागर, संदीप क्षीरसागर, नितीन क्षीरसागर, शुभम क्षीरसागर यांनी पालिकेचे आभार मानले.