उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांची तत्परता
प्रतिनिधी/ सातारा
खासदार उदयनराजेंनी ज्या जबाबदारीने उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्यावर विश्वास टाकला आहे त्याची प्रचिती रविवारी सकाळी शाहुनगरातील हिल टॉप सोसायटीच्या नागरिकांना आली. फक्त एकच फोन उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना जाताच लगेच कामाला सुरुवात झाली अन् प्रत्यक्ष उपनगराध्यक्ष मनोज शेंडेही कामाच्या ठिकाणी हजर झाले. त्यांनी केलेल्या काम पाहून नागरिक भारावले अन् उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करत महाराज साहेबांनी का उपाध्यक्ष म्हणून मनोज शेंडेंना केले तर मनोज शेंडेचे कामच भारी अशी ओघवती प्रतिक्रियाच स्थानिकांनी दिली.
किल्ले अजिंक्यताऱयाच्या पायथ्याला असलेल्या चार भिंती व शाहुनगर, गोडोलीत दरवर्षीच पावसाळय़ात पावसाच्या पाण्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. शाहुननगरातील हिल टॉप सोसायटी ही चार भिंतीच्या लगतच असल्याने डेंगरावरचे पाणी पावसाळय़ात घराघरात शिरते ही समस्या सुटता सुटत नव्हती. तेथील नागरिकांनी याबाबत रविवारी सकाळी केवळ एकच फोन करुन याची माहिती उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना दिली. इतरांसारखे अननोन फोन टाळणारे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे नाहीत याचाही प्रत्यय लगेच नागरिकांना आला. त्यांनी फोनवरुन उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना समस्या सांगितली. त्यांनी लगेच एक तासाच्या आत एक जे.सी.बी. व पाच, सहा कर्मचाऱयांची टीम चारभिंतीच्या जवळ पाठवून दिली. शाहूनगरमधील नागरिकांकडून माहिती घेऊन लगेच कामाला सुरुवात झाली. काम व्यवस्थित सुरु आहे की नाही याची पाहणी करायला स्वतः उपाध्यक्ष मनोज शेंडेही तेथे पोहचले अन् त्यांनी पाहणी करुन काम व्यवस्थित करण्याच्या सूचना दिल्या. त्यांचे काम पाहून नागरिक भारावून गेले. त्यांचा तेथेच शाल, श्रीफळ देवून सत्कार केला. स्थानिक नागरिकांनी उपाध्यक्ष मनोज शेंडे यांचे कामच भारी असून असे पदाधिकारी पाहिले नाहीत. उपाध्यक्ष मनोज शेंडे यांचे काम वाखाणण्याजोगे आहे, असेही त्यांनी संगितले.