मागील दोन दशकात भारतीय क्रिकेटची उत्तम धुरा वाहत असलेल्या महेंद्रसिंग धोनीने शनिवारी यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या निमित्ताने तब्ब्ल 437 दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर एखाद्या व्यावसायिक क्रिकेट लढतीत भाग घेत चाहत्यांना दर्शन दिले. गतवर्षी इंग्लंडमध्ये संपन्न झालेल्या आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य लढतीत धोनीने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर मात्र तो एकाही व्यावसायिक लढतीत सहभागी झाला नव्हता. मागील महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला हा दिग्गज खेळाडू आता केवळ क्लब स्तरीय क्रिकेट खेळत राहणार आहे.
Previous Articleसहा महिन्यांची पार पडली हेस्कॉमची तक्रार निवारण बैठक
Next Article घटनेनुसार आम्हाला आरक्षण द्यावे
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.