पाच पोती रिकाम्या दारूच्या बाटल्या केल्या गोळा
प्रतिनिधी सातारा
येथील पेढयाचा भैरोबा परिसरात ओल्या पाटर्य़ा वाढलेल्या आहेत. परिसराचे विद्रुपीकरण होत आहे. त्याबाबत स्थानिक नागरिकांनी आवाहन करताच शाहूपुरी, गडकर आळी परिसरातील नागरिक एकत्र जमले अन रविवारी सकाळी स्वच्छता मोहीम राबवली. तब्बल पाच पोती मोकळ्या दारूच्या बाटल्या अन पंचवीस पोती कचरा गोळा केला असून अशा पाटर्य़ा या परिसरात करणायांचा आता बंदोबस्त करण्यासाठी प्रारंभ झाला आहे.
शहराच्या पश्चिम भागात भैरोबा देवस्थान प्रसिद्ध आहे. गडकर आळी, शाहूपुरी, समाधीचा माळ या परिसरात नागरिकांना हे देवस्थान जवळचे आणि श्रद्धेचा विषय आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात अनेक जण सायंकाळी भैरोबा पायथा परिसरात ओल्या पाटर्य़ा करतात.चुली मांडतात. दारू पितात, अन तशीच घाण त्या ठिकाणी टाकून जातात, फुटलेल्या रिकाम्या बाटल्या फेकून परिसराला विद्रुप करण्याचे प्रकार वाढू लागले. ही बाब जेव्हा स्थानिक नागरिक शेखर कडवं यांच्या निदर्शनास आली तेव्हा त्यांनी फक्त आवाहन करताच परिसरातले नागरिक एकत्र होऊन दोन दिवसात सोशल मीडियावर चर्चा झाली अन प्रत्यक्ष भैरोबा मंदिर परिसराच्या रक्षणासाठी व तेथील स्वच्छता मोहिमेला रविवारी सकाळी प्रारंभ केला. तब्बल 25 पोती कचरा गोळा केला तर 5 पोती रिकाम्या बाटल्या गोळा केल्या. तसेच या परिसरात ओल्या पाटर्य़ा करणारे आढळून आले तर त्यांना हाकलून न देता तेथेच त्या परिसराची स्वच्छता करायला लावण्याची शिक्षा देऊन या होणाया पाटर्य़ा बंद करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.